कल्याण, ठाणे, भिंवडी, बदलापुर, अंबरनाथ परिसरात घरफोडी चोरी करणारा सराईत चोरटा कल्याण गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याणकडुन जेरबंद

कल्याण, ठाणे, भिंवडी, बदलापुर, अंबरनाथ परिसरात घरफोडी चोरी करणारा सराईत चोरटा कल्याण गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याणकडुन जेरबंद

ठाणे :– विष्णुनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १६/२०२५, बी.एन.एस. २०२३ चे कलम ३०५, ३३१(३), ३३१ (४) या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा घटक ३ कल्याण कडुन करण्यात येत असतांना नमुद गुन्हयाचे घटनास्थळ व परिसरात असलेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजचे तांत्रीक विश्लेषन करून संशयीत आरोपीत १) लक्ष्मण सुरेश शिवशरण तय ४७ वर्षे मुळ राहः- हनुमाननगर रूपा भवानी माता मंदिराजवळ, सोलापुर जिल्हा सोलापुर सध्या राहः- मोरया अपार्टमेंट, दुबे याचे मालकीच्या खोलीत, रूम नं. १०८, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, कशेळी गाव, काल्हेर भिंवडी जि. ठाणे, यांस निष्पन्न करून त्यास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी भिवंडी येथुन सापळा लावुन मोठ्या शिताफिने ताब्यात घेण्यात आले. लक्ष्मण सुरेश शिवशरण यास अटक करून त्याचेकडे केले तपासात त्याने चोरी केलेले सोन्याचे दागीने सुकेश मुददणा कोटीयन वय ५५ वर्षे मुळ राहः मित कुलम्म हाऊस, पोष्टः आयकडी, ता. मेंगलोर, जिल्हा:- मेंगलोर सध्या राहः सी विंग रूम नं. २१२, करण कॉम्पलेक्स, जी.सी.सी क्लबजवळ, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड याचेकडे विक्रीकरीता दिले असल्याचे निष्पन्न झालेने सुकेश मुददणा कोटीयन यालाही अटक करून तपास करण्यात आला.
अटक आरोपीत लक्ष्मण सुरेश शिवशरण याने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात घरफोडी चोरीचे एकुण ५० गुन्हे केले असल्याची कबुली दिल्याने तपासात त्याचेकडुन घरफोडी करून चोरी केलेल्या गुन्हयातील ५३,४१,२८०/- रूपये किमंतीचे ६६७ग्रॅम, ६६० मी.ली. वजनाचे सोन्याचे दागिने व ७८,९००/- रूपये रोख असा एकुण ५४,२०,१८०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून एकुण ५० घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व मा. श्री. शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, शोध १, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे, सपोनि/संतोष उगलमुगले, पोउपनि/विनोद पाटील, पोलीस अमलंदार दत्ताराम भोसले, अशोक पवार, बालाजी शिंदे, आदिक जाधव, विलास कडु, अनुप कामत, प्रंशात वानखेडे, गोरखनाथ पोटे, प्रविण बागुल, उल्हास खंडारे, सुधिर कदम, वसंत चौरे, सचिन वानखेडे, दिपक महाजन, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, विनोद चन्ने, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, महिला पोलीस अंमलदार ज्योत्स्ना कुंभारे, मिनाक्षी खेडेकर, मंगल गावित चासपोउपनिरी अमोल बोरकर यांनी केलेली आहे.