पाच पोलीस ठाणे येथून वॉन्टेड असलेला तडीपार आरोपी बिबवेवाडी पोलीसांनी शिताफितीने केली अटक

पाच पोलीस ठाणे येथून वॉन्टेड असलेला तडीपार आरोपी बिबवेवाडी पोलीसांनी शिताफितीने केली अटक
सदरबाबत अधिक माहिती अशी की, बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ३२१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९,११८(२),१८९(२) १९०.१९१ (२),१९१ (३), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चेकलम ३७ (१) सह १३५,१४२ अन्वये दाखल असून यातील फिर्यादी यांना दि.१४.१२.२०२४ रोजी पहाटे ०३.३० वा. चे सुमारास पवन नगर भाग-०१, अप्पर बिबवेवाडी पुणे व सोळा एकर मैदान सुप्पर बिबवेवाडी पुणे येथे फिर्यादी व त्यांचा मामा प्रसाद जाधव यांना जनावरे चारण्यासाठी आलेचे संशयावरुन लोखंडी रॉड, लाकडी बांबु व लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादी यांचे डोक्यात, दोन्ही पायावर, हातावर जबर जखमी करून उजवे पायास फ्रैक्चर व नाकास फॅक्चर केले आहे. तसेच प्रसाद प्रकाश जाधव यांचे डोक्यात, हातावर, छातीवर, पायावर मारुन जबर जखमी केले म्हणून फिर्यादी यांनी शिवा ऊर्फ शिवम गणेश माने, सद्दाम चमनुर शेख, सिंग नावाचा इसम व त्यांचे दोन व तीन साथीदार यांचे विरुध्द तक्रार दिली आहे. तसेच सदर गुन्ह्यातील तडीपार आरोपी शिवा ऊर्फ शिवम गणेश माने हा बिबवेवाडी पोलीस ठाणे व खालील पोलीस ठाणे येथे पाहीजे आरोपी होता.
 
१) सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३३५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३२४, ५०४, ५०६ आर्म अॅक्ट ४(२५), मुबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५
 
२) शिरवळ पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ०४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ७५, १९१(२), १२७(७), ३५१(३), ३५२, ३(५) पोक्सो कलम ७, ८ तसेच अॅट्रॉसिटी अॅक्ट ३ (१) (w) (i) (ii) ३(२) (va)
 
३) बोरगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं ९६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३(५)
 
४) स्वारगेट पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १०३/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) मुबई
 
पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५
 
वरील पोलीस ठाणे येथून फरार असलेला व आपली ओळख लपवून गुन्हे करत असलेल्या तडीपार आरोपीस वर नमुद पोलीस ठाणेकडील तपास पथके व बिबवेवाडी पोलीस ठाणे कडील तपास पथक कसून शोध घेत होते. आरोपी हा अतिषय चालाक व रेकॉर्डवरील असल्याने तो पोलीसांचे डावपेच ओळखून होता. दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले यांनी तपास पथकातील अमंलदार यांना आरोपीचा शोध घेणेबाबत योग्य त्या सुचना दिल्या.
 
सदर आरोपी बाबत अधिक माहिती काढली असता आरोपी हा त्याची मैत्रीनिकडे मध्यरात्री भेटण्याकरीता येणार असल्याची गोपनियम माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोशि १००१९ ताकपेरे, पोशि १०४४२ गायकवाड, पोशि २२९० पाटील, पोशि २२१२ काळे यांना मिळाल्याने सदर ठिकाणी अनेक दिवस पाळत ठेवून तसा सापळा रचून आरोपी हा त्याच्या मैत्रीनिकडे शिवतेज नगर येथे मध्यरात्री येताच त्यास पोलीसांनी घेरल्याची चाहूल लागल्याने तो पळून जात असताना शिताफितीने ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीस ०५ दिवसाची पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे.