रत्नागिरी, संभाजीनगर मधील उबाठा, शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारीही भाजपामध्ये
भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत
गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आ. बबनराव लोणीकर, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, रामप्रसाद बोर्डीकर, राहुल लोणीकर, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. श्री. चव्हाण यांनी सर्वांचे भाजपामध्ये स्वागत केले.
श्री. घनदाट यांच्या बरोबर परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, बाजार समिती सदस्य, नगरसेवक, सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला. राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आ. बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रवेश झाले.
यावेळी श्री. रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडणार याचा विश्वास वाटल्याने श्री. घनदाट यांच्यासह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अभ्यूदय बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मोठं काम करणारे श्री. घनदाट यांच्या भाजपा प्रवेशामुळे परभणीमध्ये पक्ष संघटनेला बळ मिळणार आहे.
श्री. घनदाट यांच्यासोबत शरद पवार गटाचे परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रसाद बुधवंत, 'वंचित' आघाडीचे नेते सुरेश फड, अनंत देशमुख, सरपंच गजानन कांगणे, रमेश गिते यांच्यासह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. परतूर (मंठा) नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे, मंठा माजी नगराध्यक्ष नितीन राठोड, मंठा नगरसेवक विकास सूर्यवंशी यांच्यासह अन्य 10 नगरसेवकांनी भाजपा प्रवेश केला.
भाजपामध्ये प्रवेश केलेल्या पालम तालुक्यातील पदाधिका-यांमध्ये परभणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सदाशिवअप्पा ढेले, जयसिंगराव शिंदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गोपीनाथराव तुडमे, नगरसेवक कैलास रुद्रवार, गौतम हत्तीआंबीरे, पंचायत समिती माजी सभापती आत्माराम सोडनर, सुभाषराव धुळगुंडे पेंडु, पेंडु खुर्दे सरपंच देवबा धुळगुंडे, पेंडु बु. सरपंच दत्तराव धुळगुंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
रत्नागिरी तालुक्यात उबाठा शिवसेनेच्या पदाधिका-यांचा भाजपा प्रवेश -
भाजपामध्ये प्रवेश केलेल्या रत्नागिरी तालुक्यातील उबाठा शिवसेनेच्या पदाधिका-यांमध्ये शिवसेना उप तालुका प्रमुख राकेश साळवी, कार्यालय प्रमुख संदीप सुर्वे, शाखाप्रमुख दीपक गावडे व दत्ता घडशी, उपविभाग प्रमुख (नाचणे) दिनेश रेमुलकर, सचिव दीपक सुकल यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांचाही प्रवेश –
छ. संभाजीनगर येथील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनीही याच कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश केला. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली हे पक्षप्रवेश झाले. यावेळी आ. निरंजन डावखरे आणि जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर उपस्थित होते. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या पदाधिका-यांमध्ये शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, विजय निकाळजे, शहर सचिव अंकुश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, मध्य विधानसभा अध्यक्ष फिरोज कुरेशी, अल्पसंख्याक विभाग शहर अध्यक्ष अस्लम शरीफ आदींचा समावेश आहे.