चंद्रशेखर आगाशे बी.एड. कॉलेज पुणे येथील 1992- 93 बॅचचा 33 वर्षानंतर स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

पुणे प्रतिनिधी : चंद्रशेखर आगाशे बी.एड. कॉलेज पुणे येथील 1992- 93 बॅच चा 33 वर्षानंतर स्नेहमेळावा के.के रिसॉर्ट, वेल्हा पुणे येथे दि.16 ऑगस्ट रोजी संपन्न झाला.
या मेळाव्यात राष्ट्रपती पुरस्कार विजेते सरपंच, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, मार्गदर्शक, उद्योजक असे वेग वेगवेगळ्या. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सहकारी क्षेत्रात यशस्वी झालेले 57. वर्गमित्र ,मैत्रिणी एकत्र आले होते.
परिचय सत्र मध्ये शिक्षणा नंतर चा संघर्ष ते सफलता चे किस्से किती रोमांचक होते हे सांगून मित्रांचा आधार किती अनमोल असतो हे
"मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा " या संग्राम या मित्राच्या गीताने सर्व भारावून गेले.
भावी काळात एकमेकात मिसळत राहून सर्वांच्या सुख दुःखात एकत्र येत मैत्रीचा आधार देण्याचा संकल्प केला. सेवानिवृत्त व आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मित्रांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, व बुके देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
श्री. अमर बनसोडे व रमेश बामने यांनी केले. प्रास्ताविक बबन ऊर्फ नंदू घुले यांनी केले.
आभार राजेंद्र पायगुडे व संग्राम यांनी मानले .