डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उत्साहात निवड
भव्य मिरवणुकीच्या तयारीला वेग : जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर
सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी नागेश इंगळे यांची तर उपाध्यक्षपदी राज लोखंडे यांची कार्याध्यक्षपदी पंकज ढसाळ यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी संविधान भवन (नॉर्थकोट प्रशाला) येथील मैदानावर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी सुमित्रा केरू जाधव होत्या. यावेळी विश्वस्त समितीचे अध्यक्ष बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागेश इंगळे यांचा सत्कार करताना रॉकी बंगाळे, गौतम चंदनशिवे, मिलिंद प्रक्षाळे, रविकांत कोळेकर, अश्विन सोनवणे, आनंद चंदनशिवे, सचिव रॉकी बंगाळे, बाळासाहेब वाघमारे, विकी शेंडगे, रविकांत कोळेकर, अजित बनसोडे, पप्पू गायकवाड, शांतीकुमार नागटिळक, गौतम चंदनशिवे, सिद्धू पांडगळे, नागेश इंगळे, सागर उबाळे आदी उपस्थित होते. नवे पदाधिकारी पुढीलप्रमाणे सचिव दीपक गवळी, खजिनदार रसूल
१९ एप्रिल रोजी मिरवणूक
विश्वस्त समितीचे अध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, जयंतीनिमित्त १३ एप्रिल रोजी मध्यरात्री प्रतिमेची स्थापना करण्यात येणार आहे. दरम्यान, विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. १९ एप्रिल रोजी प्रबोधनात्मक देखाव्यांसह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक शांततेत व शिस्तीत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पठाण, उपाध्यक्ष राज लोखंडे, इरफान शेख, अयान दिना, ऑडिटर वाहीद विजापुरे, कायदेशीर सल्लागार अँड विशाल मस्के, अँड जयप्रकाश भंडारे. आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Ks News सोलापूर प्रतिनिधी राज लोखंडे