दिनांक ०७/११/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे यांना त्यांचे गोपनीय बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, कोथरूड पोलीस स्टेशन गु.र.नं २५०/२०२५. भा. न्या.स. क. १०९, ३५१, ३५२, १८९, १९० व आर्म अॅक्ट क. ३(२५), अन्वये दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी जयेश कृष्णा वाघ, वय ३६ वर्षे, रा.स.नं. ४४ विठ्ठल मंदिरासमोर, केळेवाडी, कोथरूड, पुणे. हा कोंडारी गाव टिटवाळा, कल्याण तालुका पोलीस स्टेशन कल्याण, जिल्हा ठाणे येथे आपली ओळख लपवून राहत आहे.
सदरची बातमी मिळताच तात्काळ सदर पोलीस पथक यांनी नमुद ठिकाणी जावून आरोपीचा शोध घेतला असता. सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे. जयेश कृष्णा वाघ, वय ३६ वर्षे, रा. स.नं. ४४ विठ्ठल मंदिरासमोर, केळेवाडी कोथरूड, पुणे. हा मिळुन आला असता त्यास ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), पुणे शहर, श्री. निखील पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त १, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. विजय कुंभार, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखे कडील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती, अश्विनी जगताप, यांच्या सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, अमर पवार, नितीन बोराटे तसेच युनिट ०२ कडील पोलीस अंमलदार अविनाश कोंडे, बबलू मांढरे व नागेश राख यांनी केली.