पीसीयूमध्ये शैक्षणिक-औद्योगिक समन्वय बळकट करण्यासाठी ‘एआय आणि जनरेटिव्ह एआय’ कार्यशाळा..

पीसीयूमध्ये शैक्षणिक-औद्योगिक समन्वय बळकट करण्यासाठी ‘एआय आणि जनरेटिव्ह एआय’ कार्यशाळा..
पिंपरी :-आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक उदयोन्मुख उद्योग असून भविष्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. शैक्षणिक क्षेत्रासह औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देखील एआयचे महत्त्व वाढत आहे. त्यासाठी पीसीयू मधील प्राध्यापकांनी हे नवीन तंत्रज्ञान समजून घेऊन नेहमी पुढे राहिले पाहिजे. शैक्षणिक क्षेत्राचा वेग औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीशी सुसंगत ठेवण्यासाठी एआय समजून घेणे व शिकणे आवश्यक आहे. पीसीयूचे अभ्यासक्रम हे भविष्यकाळासाठी तयार करण्यात आले आहेत, जे प्राध्यापकांना अद्ययावत आणि उद्योगाच्या अपेक्षांशी जुळणारे ज्ञान देण्यास सक्षम आहेत असे पीसीयूच्या कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी यांनी सांगितले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील अत्याधुनिक ज्ञान व कौशल्ये समजून घेऊन ते विद्यार्थ्यांना शिकवून त्यांचे ज्ञान अद्यावत करण्यासाठी “एआय आणि जनरेटिव्ह एआय” सारख्या कार्यशाळा उपयोगी ठरतील, यामुळे शैक्षणिक क्षेत्रासह वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक क्षेत्राशी सुसंगत राहणे विद्यार्थ्यांना शक्य होईल असे पीसीयूचे प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) मध्ये ‘एआय आणि जनरेटिव्ह एआय’ या विषयावर दोन दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित केला. यासाठी सुपरप्रो एआय आणि इनोप्लेक्सस यांचे सहकार्य मिळाले.यावेळी फोर्ब्स मार्शल, पुणे युजर बिझनेस’ प्रमुख राजेश पाटील, इनोप्लेक्सस प्रा. लि. सह-संस्थापक गौरव त्रिपाठी, समन्वयक डॉ. पल्लवी अहिरे आदींसह पीसीयू मधील विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.
प्र – कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी सांगितले की, पीसीयूमध्ये विद्यार्थ्यांना उद्योगांसाठी सक्षम करण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक दृष्टिकोनातून तयार केले आहेत. आमचे अभ्यासक्रम उद्योगकेंद्रीत आणि व्यावहारिक आहेत, जेणेकरून आमचे विद्यार्थी एआयच्या जगात आवश्यक कौशल्ये आत्मसात करून नेहमी पुढे राहतील. पीसीयूच्या ३० प्राध्यापकांना एआय आणि जनरेटिव्ह एआय विषयक अद्ययावत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे प्राध्यापकांना एआय क्षेत्रातील नवीन विकसित झालेली माहिती मिळाली व व्यावहारिक कौशल्ये प्राप्त झाली.
 
ही कार्यशाळा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर आणि नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.