महापालिकेच्यावतीने पनवेल सिटी सेंटर या धोकादायक इमारतीवर निष्कासन कारवाई

पनवेल,दि.२०: पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ड मार्फत पनवेल सिटी सेंटर, अंतिम भूखंड क्रमांक १९७, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती. परंतु सदर इमारत वारंवार सूचना देऊन देखील रिक्त न केल्याने मा. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सदर इमारतीचे विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा खंडित करून धोकादायक इमारत रिक्त करण्यात आली.
मा. आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार श्री. रविकिरण घोडके, उपायुक्त (अ. बां. नि .) यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त डाॅ. रुपाली माने, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, श्री. अरविंद पाटील, श्री. अमर पाटील, प्रभाग अधीक्षक श्री. रोशन माळी, पालिका कर्मचारी , सुरक्षा रक्षक, पोलिस विभाग यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साह्याने या इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.
पावसामुळे धोकादायक इमारतीच्या भिंती फुगून कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पनवेल महानगरपालिकेमार्फत घोषित केलेल्या धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी त्वरित धोकादायक इमारती रिक्त करून महानगर पालिका प्रशासनास सहकार्य करावे तसेच स्वतः हून त्या निष्कासित करून घ्याव्यात.जेणेकरून जीवितहानी होणार नाही . तरी नागरिकांनी सहकार्य करावे.असे आवाहन मा.आयुक्त तथा प्रशासक श्री. मंगेश चितळे यांनी केले आहे.