महाळुंगे एमआयडीसी मौजे वराळे येथील मे. कैलाश स्टील कंपनीचे मॅनेजर यांचेवर अज्ञात व्यक्तींकडुन गोळीबार.

महाळुंगे एमआयडीसी  मौजे वराळे येथील मे. कैलाश स्टील कंपनीचे मॅनेजर यांचेवर अज्ञात व्यक्तींकडुन गोळीबार.

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :- दिनांक २०/०१/२०२५ रोजी सकाळी १०/५० वा. सुमारास मौजे वराळे ता. खेड, जि. पुणे, येथील मे. कैलाश स्टील कंपनीचे आवारात सदर कंपनीचे मॅनेजर श्री. अजय विक्रम सिंग, रा. हिंजवडी, पुणे यांचेवर काळ्या रंगाचे मोटारसायकल वरुन आलेल्या हेल्मेट घातलेल्या दोन अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरुन जिवे मारण्याचे उद्देशाने त्यांचेजवळील पिस्तुलाने ०२ गोळया झाडून गंभीर जखमी केले व त्यानंतर वराळे - भांबोली
गावाच्या दिशेने पळुन गेले आहे. सदर बाबत कंपनीचे सुपरवायजर यांनी महाळुंगे पोलीस स्टेशन येथे येवुन सदर गुन्ह्याची फिर्याद दिली आहे. त्यावरुन महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न करण्याबाबत गु. रजि. नं /२०२५ बीएनएस १०९ वगैरे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्राथमिक तपासात व्यवसाईक अर्थिक देणे-घेणे किंवा खंडणी या कारणा वरून सदर गुन्हा घडल्याची बाब निर्दशनास आलेली नाही, गुन्हयाचा अधिक तपास चालू आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचे
मार्गदर्शनाखाली मा. डॉ शशिकांत महावरकर, सह- पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त,
परीमंडळ ०, मा. श्री. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री. राजेंद्रसिंह गौर,
सहा. पोलीस आयुक्त, चाकण विभाग, श्री. नितीन गिते, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन, श्री.
जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ३, श्री. प्रविण कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी तात्काळ भेट देवुन, सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेणेकरीता १० पथके स्थापन करुन, कसोशिने तपास सुरू करण्यात आला आहे.