मानवत शहरात भव्य अमृतेश्वर शिव मंदीर बांधकामाचा प्रारंभ

मानवत शहरात भव्य अमृतेश्वर शिव मंदीर बांधकामाचा प्रारंभ
लोकनेते डाॅ. अकूंशराव लाड यांनी महादेव भक्तांना मंदिर बांधण्यासाठी स्वखर्चातून जागा दिली. मानवत शहरातील माळी गल्ली वासियांचे एक स्वप्न पूर्ण झाले.  श्री अमृतेश्वर महादेव मंदिराच्या नियोजित जागेचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला. मानवत शहराचे विकासरत्न डॉ.  अंकुशराव लाड यांची माळी गल्ली वासियांसाठी अनोखी भेट; जागा घेऊन देऊन मंदिर बांधकामासाठी ही घेतली हमी. मानवत शहरातील माळी गल्ली परिसरातील नागरिकांनी मंदिर करायचे ठरवले पण जागा नव्हती. त्यामूळे सर्व माळी गल्लीतील नागरिकांनी मंदिर करायाची भावना मानवत शहराचे विकासरत्न डाॅ. अंकुशराव लाड यांच्याकडे व्यक्त केली. कोणता ही वेळ न दवडता डाॅ. लाड यांनी मंदिर बांधकामासाठी लागणारी जागा खरेदी करून मंदिर कार्याचे लोकार्पण करायचे ठरवले. 
श्री अमृतेश्वर महादेव मंदिराच्या जागेचा भव्य लोकार्पण सोहळा दिनांक २५ एप्रिल वार शुक्रवार रोजी सायं ७ वा पार मोठ्या भाविक भक्तांच्या साक्षीने पार पडला.  या लोकार्पण सोहळ्याचे वेळी शिवलीला अमृत ग्रंथ समाप्ती सोहळा करण्यात आला. तसेच पंचक्रोशीचे भूषण अनंत श्री विभूषित १००८ महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज व भारतीताई यांच्या उपस्थित डॉ. अंकुशराव लाड यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा पार पडला. जागेच्या लोकार्पण सोहळ्यात डॉ.अंकुशराव लाड यांच्या हस्ते श्री अमृतेश्वर मंदिराच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. 
सदरील मंदिरासाठी लागणारी जागा ही डॉ.अंकुशराव लाड यांनी स्व,खर्चातून मंदिरासाठी दिली व या जागेची संपूर्ण कागद पत्रे ही संयोजन कमिटीकडे सुपूर्द केली. तसेच मंदिराचे पूर्ण बांधकाम देखील तात्काळ केले जाईल असे आश्वासन दिले याबद्दल श्री अमृतेश्वर महादेव मंदिर सोहळा समिती, माळी गल्लीच्या वतीने डाॅ. अकूंशराव लाड यांचे आभार मानले. 
याप्रसंगी गणेश कुमावत, बाळासाहेब मोरे, मोहनराव लाड, अँड. अनिरुद्ध पांडे, दत्ता चौधरी, श्रीधर कोक्कर, किशोर लाड, गणेश उगले, प्रभाकर रासवे, यशवंत रासवे, विठ्ठल रासवे, बबन राऊत, नारायण रासवे, बळीराम रासवे, यांच्यासह समाज बांधव , भाविकभक्त  व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद रासवे यांनी केले तर प्रास्ताविक उद्धव रासवे यांनी केले.