विधान परिषद सभापती मा.श्री प्रा राम शिंदे यांनी लोकप्रतिनिधी ॲपला दिल्या शुभेच्छा!

(मुंबई विशेष प्रतिनिधी) आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल संकल्पना घेऊन लवकरच लोकप्रतिनिधी ॲप लॉन्च होणार असून, महाराष्ट्र राज्यातील सर्व निवडून आलेले सर्व पक्षीय खासदार आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष/सदस्य पंचायत समिती ,नगरपालिका, नगरपरिषद महानगरपालिका त्याचबरोबर सर्व महामंडळाचे सदस्य आणि ग्रामपंचायत मधील सर्व सरपंचाची डिजिटल माहिती उपलब्ध होणार असून, त्याचे उद्घाटन लवकरच होणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक विजय ओहोळ आणि संचालिका रुपाली बैसाने यांनी सांगितले.विधान परिषदेतील सर्व आमदाराची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेला मानस असल्यामुळे आज विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी शुभेच्छा पत्र देवून जनहितार्थ सुरू केलेल्या लोकप्रतिनिधी ॲपला शुभेच्छा दिल्या.