पुसद तालुका प्रतिनिधी:-
हनुमान व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष, मा.शिवसेना तालुका प्रमुख,
स्वर्गीय बाबाराव विठोबा लेवेकर पैलवान यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मौजे मोहा इजारा येथील नालंदा बुद्ध विहाराला शव वाहिनी शिडी अर्पण करण्यात आली.सकाळी 10.30 वाजता माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय इथे रूग्नालयात भरती असलेल्या रुग्नांचे नातेवाईक तसेच इतर गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले.
स्व.बाबाराव लेवेकर पैलवान यांनी आपल्या जिवनामध्ये असंख्य कुस्त्या करीत आखाडे गाजविले.त्याच्या जिवनातील सगळ्यात मोठी कुस्ती म्हणजे हिंदकेसरी असणाऱ्या बलाढ्य अशा नावलौकिक असणारे दादा चौगुले यांना पुणे येथील कुस्ती मैदानात क्षणातच चारीमुंड्याचित करीत मैदान गाजविले होते. त्यानी त्यांच्या जिवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत लाल मातीची संगत सोडली नाही. ते जिवनाच्या शेवट पर्यंत सायकल चालवित राहीले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ केसरी सारखे मल्ल, पैलवान निर्माण झाले.ही अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे स्व.बाबाराव लेवेकर पैलवान यांच्या स्मृतिदिनी त्याना आदरांजली अर्पण करण्यात आली.
मौजा मोहा ईजारा येथील नालंदा बौद्ध विहाराला शव वाहिनी शिडी अर्पण करताना नालंदा बुद्ध विहाराचे बलवंत मनवर व अनेक बौद्ध बांधव उपस्थित होते.
गरजू नागरिकांना अन्नदान करताना माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव याचे सह माणुसकीची भिंत ची संपूर्ण टीम उपस्थित होती.
स्व.बाबाराव लेवेकर पैलवान यांचे स्मृती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या समाज उपयोगी कार्यक्रमाला श्री रमेश चव्हाण पाटील,शरद बजाज, संजय सिंह बयास तालुकाप्रमुख शिवसेना, विनोद चव्हाण ग्रामपंचायत सदस्य गायमुख नगर, अमोल वानखेडे, अरविंद कांबळे, विजय राठोड, संतोष शर्मा एड. राजेंद्र शिंदे, दीपक उखळकर शिवसेना शहर प्रमुख, अनिल चव्हाण पाटील शिवसेना शहर संघटक,राहुल वाढवे, प्रा.श्री विशाल जाधव, पवन चव्हाण पाटील, सचिन चव्हाण पाटील, यशवंतराव चव्हाण, अंबादास लेवेकर यांचेसह स्व.बाबाराव लेवेकर पहीलवान यांचेवर प्रेम करणारे असंख्य प्रेमीजण उपस्थित होते.