सरपंच संघटनेच्या वतीने शासनास ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
(पुरंदर प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी व राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर व्हावा या आशयाचे निवेदन मा. तहसीलदार पुरंदर यांच्याकडे देण्यात आले. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निवेदन देण्यासाठी सरपंच संघटनेचे अध्यक्ष हरिदास खेसे, सिंगापूरच्या माजी सरपंच संगीता वारे, वाघापूरच्या माजी सरपंच रेवती कुंजीर,सरपंच संघटनेच्या महिला अध्यक्ष दौंडज गावच्या माजी सरपंच सीमा भुजबळ भिवरीचे माजी सरपंच विशाल भाऊ कटके, लपतळवाडीचे नवनिर्वाचित सरपंच रवींद्र मोरे कोडीत बुद्रुकचे योगेशजी खुटवड , सरपंच संघटनेचे निमंत्रक जवळअर्जुनचे सरपंच सोमनाथ भाऊ कणसे त्याचप्रमाणे भिवरी गावचे माजी उपसरपंच लालासो कटके व अक्षय गायकवाड, नारायणपूरचे माजी सरपंच चंद्रकांत बोरकर तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी पुरंदर तालुक्याचे आजी माजी सरपंच उपस्थित होते. सरपंच संघटनेचे प्रतिनिधी म्हणून सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आणि शेतकऱ्यांच्या प्रति आपण आपल्या सदभावना आणि कर्तव्य व्यक्त करण्याचा प्रयत्न केला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष हरदास खेसे यांनी सांगितले त्यावेळी सर्व उपस्थितांचे सरपंच संघटनेच्या पदाधिकारी आणि आजी माझी सरपंच ची मनःपूर्वक आभार जवळी अर्जुनचे ग्रामपंचायतचे सरपंच यांनी मानले सर्व सरपंच बंधू-भगिनी आज नवरात्र उत्सवामुळे येऊ शकले नाहीत त्यांनी आपला निवेदनास पाठिंबा असल्याचा मेसेज पाठवला होता त्यांचे देखील मनःपूर्वक हार्दिक आभार मानत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष खेसे यांनी सांगितले सरपंच संघटनेच्या वतीने पुरंदर तालुक्यातील गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन लवकरच सरपंच सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्याची विनंती केली असता गटविकास अधिकाऱ्यांनी देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला असून लवकरच आपण पंचायत समितीच्या सभागृहात भेटणार आहोत असे सरपंच संघटनेचे अध्यक्ष हरीभाऊ खेसे यांनी सांगितले