स्वेरीत सिव्हील इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स व एमसीए या विभागांचा पालक मेळावा संपन्न

[5:31 PM, 5/7/2025] Santosh Halkude: पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या, सिव्हील इंजिनिअरिंग, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग व पदव्युत्तर पदवी असलेल्या एमसीए या तिन्ही विभागांतर्फे एकत्रितरीत्या ‘पालक मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली या तीन विभागांच्या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणून अभिजित भोसले, कै. लक्ष्मणराव इंगोले शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर इंगोले व महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ.अलका शिंदे ह्या उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनानंतर सिव्हील इंजिनिअरिंग विभागातर्फे विभागप्रमुख डॉ. एस.पी. पाटील, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातर्फे प्रा. व्ही.डी.जाधव तर एमसीए विभागातर्फे प्रा. एम.वाय शेख यांनी आपल्या विभागातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या बाबी सविस्तरपणे सांगितल्या. यामध्ये प्रयोगशाळेत उपलब्ध यंत्र सामुग्री, अद्ययावत असलेले मशीन्स, इंडस्ट्रीयल व्हिजीटच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कसे कामकाज चालते या बाबत प्रात्यक्षिक माहिती, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी, ग्रंथालयात अभ्यास व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपलब्ध असलेली पुस्तके, महाविद्यालयाला मिळालेली मानांकने आणि त्याचे विद्यार्थ्यांना भविष्यात होणारे फायदे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व वाढीसाठी एन.एस.एस., नियमित योगा, कार्यशाळा यासारखे विविध उपक्रम, उच्चशिक्षण घेतलेल्या प्राध्यापकांची यादी, गुणवंत विद्यार्थ्यांची आकडेवारी, तसेच विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांसंदर्भात विकासात्मक धोरण, नियोजनात्मक मार्गदर्शन, 'गेट' परीक्षेची तयारी, नियमित घेतल्या जाणाऱ्या टेस्ट आणि त्यांचे विश्लेषण यामधून विद्यार्थ्यांना मिळणारी तंत्रशिक्षणातील अद्ययावत माहिती, या व अशा विविध उपक्रमांची माहिती तिन्ही विभागांकडून देण्यात आली. पालक मेळाव्यात पालकांनी पाल्याच्या यशात आपली नेमकी काय भूमिका असावी याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी ‘गेट’ या अवघड परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. पूजा रोंगे यांच्यासह तिन्ही विभागांतील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्लेसमेंट विभागाचे प्रा.एस.एम.खोमणे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या ‘गेट परीक्षा, स्वेरीमध्ये येणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या, प्लेसमेंट विभागामार्फत चालणारे कार्य, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीसाठी व करिअर करण्यासाठी आवश्यक बाबी, इंग्रजी भाषा कौशल्ये, आत्मविश्वास वाढविण्यासाठी व संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी विविध स्पर्धात्मक प्रयोग, सादरीकरण, प्रकल्प, तांत्रिक प्रशिक्षण, इंटर्नशीप, स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? हे करताना पालकांनी कोणती भूमिका घ्यावी ? आदी करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची माहिती पालकांना दिली. यावेळी स्वेरीच्या नियोजनावर आणि यातून झालेल्या पाल्यांच्या प्रगतीबाबत पालकवर्ग समाधानी असल्याचे जाणवले. कांही पालकांनी किरकोळ सूचना केल्या असता संबंधित सूचना व प्रश्न वरिष्ठ पातळीवर सोडविण्याचे आश्वासन विभागप्रमुखांनी दिले. या पालक मेळाव्यात प्रा. पूजा रोंगे, प्राध्यापक वर्ग, तिन्ही विभागातील विद्यार्थ्यांचे साधारण २५० पालक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. एस. ए. शेगदार व प्रा. पी.व्ही.केळकर यांनी पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन केले तर वसतिगृह व्यवस्थापक डॉ. करण पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
छायाचित्र- स्वेरीमध्ये सिव्हील इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स व एमसीए या विभागांचा पालक मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी डावीकडून पूजा रोंगे, प्रा. व्ही.डी.जाधव, महिला पालक सौ.अलका शिंदे, डॉ. एस.पी. पाटील, भीमाशंकर इंगोले, अभिजित भोसले व प्रा. एम.वाय शेख.