कु . दिपाली पाडवी यांची एमपीएससीत भरारी बहुजन कल्याण अधिकारी पदी निवड

(नंदुरबार प्रतिनिधी ) दिपाली अर्जुन पाडवी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून बहुजन कल्याण अधिकारी या पदी नुकतीच निवड करण्यात आली दिपाली ह्या राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून उत्तीर्ण झाल्या असून
दिपाली यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण डॉ. काने विद्यामंदिर व गर्ल्स हायस्कूल नंदुरबार येथे झाले आहे तसेच त्यांचे पदवीचे शिक्षण जे टी पाटील महाविद्यालयातून पूर्ण केले आहे सध्या त्या एन.डी.व्ही.एस विधी महाविद्यालय नंदुरबार येथे एल.एल.बी (कायद्याचे) च्या तृतीय वर्षात शिकत आहेत त्यांना त्यांचे वडील अर्जुन पाडवी निवृत्त कृषी पर्यवेक्षक, आई सुनंदा पाडवी, भाऊ नितीन पाडवी (झेडपी शिक्षण पाचोरा) यांची सात व मार्गदर्शन लाभले तसेच विधी महाविद्यालयातील प्राचार्य एन डी चौधरी सर तसेच प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतरवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले अत्यंत गरिबीतून आणि हालाकीतून आपले शिक्षण पूर्ण करून उच्चपदी विराजमान झालेल्या पाडवी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि सोशल मिडिया वर शुभेच्छा वर्षाव केला जात आहे .