12th Board Exam : बारावी बोर्ड परीक्षा राज्यातील १५ लाख विद्यार्थी देणार परीक्षा...

12th Board Exam : बारावी बोर्ड परीक्षा राज्यातील १५ लाख विद्यार्थी देणार परीक्षा...
पुणे :-- राज्यातील ३ हजार ३७३ परीक्षा केंद्रावर मंगळवारपासून १२ वीच्या परीक्षा सुरु होणार आहे. ही परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१५ कालावधीत होत आहे. यंदा परीक्षेसाठी एकूण १५ लाख ५ हजार ३७विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले, तर ६ लाख ९४ हजार ६५२ मुली आहेत.
 
यंदा ३७ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्यात एकूण १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. प्रत्येक परीक्षा केद्रांवर बैठे पथक असणार आहे. तसेच ड्रोनची नजरही असेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोसावी म्हणाले, विज्ञान शाखेला ७ लाख ६८ हजार ९६७ विद्यार्थी, कला शाखेला तीन लाख ८० हजार ४१० विद्यार्थी, वाणिज्य शाखेला तीन लाख १९ हजार ४३९ विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम ३१ हजार ७३५ विद्यार्थी आहेत. टेक्निकल सायन्स ४ हजार ४८६ असे एकूण १५ लाख ५ हजार ३७विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत. पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा होणार आहे.
राज्यात २७१ भरारी पथके..
 
परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय दक्षता समिती कार्यरत असून विभागीय मंडळात विशेष भरारी पदके स्थापन करण्यात आली आहेत. मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी, वैद्यकीय कारणास्तव प्रत्यक्ष तोंडी परीक्षा प्रकल्प व इतर परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर १२,१५,१७ मार्च रोजी आऊट ऑफ टर्न आयोजित करण्यात आलेले आहे.