अण्णा बनसोडे यांचा विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल!

अण्णा बनसोडे यांचा विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल!

पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष  पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महायुतीमध्ये विधानसभा उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले आहे. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत हे उपस्थित होते. आमदार अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. सत्ताधारी पक्षाचे २३६ इतके भक्कम संख्याबळ आणि त्याचवेळी विरोधकांचे केवळ ५२ आमदार विधानसभेत आहेत. हे लक्षात घेता विरोधी पक्षांकडून उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढविली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे बनसोडे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.