उद्या १२०० विद्यार्थी करणार योगा विश्वविक्रम

उद्या  १२०० विद्यार्थी  करणार योगा विश्वविक्रम

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्राथमिक शाळेमध्ये उद्या दि. १८ जानेवारी २०२५ रोजी  १२०० विद्यार्थी प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचे विविध योगा सादर करीत विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत. पुणे शहरात   पहिल्यांदाच असा प्रयत्न केला जात आहे. १५० मिनिटांमध्ये विद्यार्थी वेगवेगळी शारीरिक योगाचे ३० प्रकार  सादर करणार आहेत. या विश्वविक्रमात १२०० विद्यार्थी काल योग, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, ट्रायबल योगा, अॅनिमल योगा, बर्ड पोजेस, दंड  योग, पार्टनर योगा, रिव्होल्यूशनरी पोजेस, तालीयोग, ऱ्हिदमिक योगा, इक्विमेंट योगा, थेरा बँड योग, ब्रिक्स योग, चेअर योगा, मेडिसनल बाॅल योगा, योगा फाॅर स्पोर्ट्स, डान्स योगा, पॅट्रियाॅटिक मंडल योग, अॅक्वा योगा, स्पिरिच्युअल योगा आणि पावर योगा सादर करणार आहेत. याच कार्यक्रमात पालकांच्या ढोलताशा पथकाचे संचलन होईल.
 या उपक्रमासाठी शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी खूप दिवस मेहनत घेतली आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये योग्य तो बदल करून त्यासंदर्भात विशेष काळजी घेण्यात येत आहे, अशी माहिती डीईएस प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे यांनी दिली.
डीईएस प्राथमिक  शाळेत गेल्या दोन वर्षांपासून योगाचे नियमितपणे प्रशिक्षण दिल्या जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तसेच अनेक पालकदेखील सहभागी झालेले आहेत.