जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केली मृद व जलसंधारण कामांची केली पाहणी

हिंगोली (जिमाका), दि. 08 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमुनरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे कृषी विभागामार्फत चालू असलेल्या विविध मृद व जलसंधारण कामांची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कंपोझिट गॅबियन स्ट्रक्चर या कामासंदर्भात काम करणारे कॉन्ट्रॅक्टर व कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामांची गुणवत्ता राखण्याच्या सूचना केल्या. तसेच जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी इसापूर बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जिवककुमार कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी नितीन घुगे, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक उपस्थित होते.