परळी जि. बीड दि.१९: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. तसेच मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास आराखड्यातील कामांची पाहणीही त्यांनी केली.
यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते यावेळी अभिषेक करण्यात आला. मंदिर देवस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री श्री.पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे तसेच लोकप्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला.
**