सर्वसामान्य कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांअंतर्गत सिल्लोड येथे लाभ मिळणार आ. अब्दुल सत्तार

सर्वसामान्य कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांअंतर्गत सिल्लोड येथे लाभ मिळणार आ. अब्दुल सत्तार
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.20, शहरातील सोनार रुग्णालय येथे सुरू करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या पंतप्रधान आयुष्मान भारत आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.

          जन आरोग्य योजने अंतर्गत, पालकांना त्यांच्या मुलांवर सिल्लोड येथे आता सरकारी खर्चाने सोनार या खाजगी रुग्णालयात उपचार घेता येणार असल्याने रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आ. अब्दुल सत्तार यांनी केले. सर्वसामान्य कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांअंतर्गत सिल्लोड येथे लाभ मिळणार आहे. कोरोना साथीच्या काळात सोनार रुग्णालयात बाल कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते असे सांगत आता सरकारी योजनांअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलांवरही या रुग्णालयात उपचार केले जातील असे आ. अब्दुल सत्तार म्हणाले.
महात्मा फुले जन आरोग्य योजना गरिबांसाठी वरदान - आ. अब्दुल सत्तार

 
    मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आरोग्य सुविधेचे बळकटीकरण करण्यात येत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गरिबांसाठी वरदान असल्याचे प्रतिपादन यावेळी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. राज्यातील नागरिकांना गंभीर आजारांवरील दर्जेदार उपचार पूर्णतः मोफत उपलब्ध करवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवली जात असून गरजूंनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, राजश्री निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, श्रीरंग पाटील साळवे, अब्दुल आमेर, कुणाल सहारे, माजी नगरसेवक अकील वसईकर, शिवसेना पदाधिकारी देविदास पा.लोखंडे, डॉ.पी.टी.सोनार, डॉ. एम.पी. सोनार, स्वप्नील सोनार, जयश्री सोनार आदी उपस्थित होते. 
 
प्रास्ताविक डॉ. एस.पी. सोनार यांनी केले आणि सूत्रसंचालन रेणुका विसपुते यांनी केले. डॉ. रूपाली सोनार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनार कुटुंबासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.