वंचित बहुजन आघाडी तर्फे धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न...

वंचित बहुजन आघाडी तर्फे धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न...

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील बौद्ध लेनीच्या पायथ्याशी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. गतवर्षी सुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांनी हजेरी लावली होती. विविध मागण्या प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून त्याचा निकाल लावण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले. औरंगाबाद पश्चिम शहर कमिटी अध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे यांच्या मार्फत सदरील लेणी परिसरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जवळपास 73 समाज बांधवांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर त्रिभुवन, मेघानंद जाधव, शुभम मगरे, राहील शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.