सिल्लोड येथे श्रीराम महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.6,सिल्लोड येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. रविवार ( दि.6 ) रोजी शहरातील श्रीराम मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल पहायला मिळाली. सायंकाळी श्रीराम जन्मोत्सव रामनवमी निमित्त शहरातील त्रिवेणी गल्ली भागातील श्रीराम मंदिर येथून दरवर्षी प्रमाणे भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना रामनवमी निमित्त शुभेच्छा दिल्या.
मिरवणुकीत जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, माजी सभापती रामदास पालोदकर, मनोज झंवर, राजेंद्र ठोंबरे, विशाल जाधव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, आशिष कुलकर्णी, गौरव सहारे, शिवा टोम्पे, आशिष कटारिया, आनंद सिरसाट , राम तसेवाल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.