कोळी महादेव समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
अमरावती : कोळी महादेव व महादेव कोळी समाजाला संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य कृती समितीचे महासचिव उमेश ढोणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावती येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयात आले असता, ढोणे यांनी त्यांची भेट घेऊन समाजाचा प्रलंबित प्रश्न मांडला. या विषयावर स्वतंत्र बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.