पनवेल महापालिका मुख्यालयात राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त अभिवादन

पनवेल महापालिका मुख्यालयात राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त अभिवादन
पनवेल महापालिका मुख्यालयात राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त अभिवादन

पनवेल, दि. ७ सप्टेंबर : आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ब्रिटिश राजवटीविरोधात सशस्त्र संघर्ष उभारून स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे राजे उमाजी नाईक यांचे शौर्य, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठा आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या क्रांतिकारी कार्याचे स्मरण करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती बबन मुकादम, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, प्रभाग समिती ड सभापती अजय बहिरा, अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, उपायुक्त मंगला माळवे, शहर अभियंता राजेश कर्डिले, सहायक आयुक्त बाळाराम रातांबे, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख कीर्ती महाजन, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.