आगामी विधान परिषद निवडणूक - (दि.२७ मार्च २०२५) मध्ये पिंपरी चिंचवड शहराला विधान परिषद सदस्य म्हणून योग्य त्या कार्यकर्त्याला संधी मिळावी..
मध्यवर्ती कार्यालयता बहुमताने ठराव पारित… अजितदादांकडे केली मागणी…
(पिंपरी दि. १२) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा ची महत्वाची बैठक आज बुधवार, दिनांक, १२ मार्च, २०२५ रोजी मध्यवर्ती पक्ष कार्यालय, पिंपरी येथे संपन्न झाली.
आगामी महाराष्ट्र राज्यातील विधान परिषद निवडणूक ही दि.२७ मार्च २०२५ रोजी होणार असून, दिनांक १० ते १७ मार्च दरम्यान नामनिर्देशन पत्र भरण्यात येणार असून त्यासाठी पिंपरी चिंचवड शहराला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी सदर बैठकीत विषय घेण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता शहरात पक्षाला अधिकची ताकद मिळण्यासाठी विधानपरिषदेच्या माध्यमातून संधी मिळावी, अशी बैठकीत चर्चा करण्यात आली.
आपल्या नेतृत्वाखाली दि. १६ जुलै २०२४ रोजी पुणे येथील सर्किट हाऊस येथे पिंपरी चिंचवड शहरातील आजी-माजी नगरसेवक नगरसेविका यांच्या एकत्रित बैठकीमध्ये जवळपास १४० आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते. सन १९८७ ते २०२२ पर्यंतचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्वांची एक मुखी मागणी होती की, आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये शहरामधून योग्य त्या कार्यकर्त्याला आपण संधी द्यावी तसेच विविध महामंडळ अध्यक्ष तसेच राज्य सदस्य या पदांच्या माध्यमातून अधिकची संधी मिळावी, असा ठराव शहर कार्याध्यक्ष फजल शेख यांनी मांडला व त्याला अनुमोदन महिला अध्यक्ष कविता आल्हाट व सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसमल यांनी दिले.
सुचक :- श्री.फजल दस्तगीर शेख , कार्याध्यक्ष
अनुमोदक:- सौ.कविता आल्हाट, महिला अध्यक्षा
श्री.संजय दयानंद औसरमल, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष
यावेळी महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, शेखर काटे, वर्षा जगताप, चेतन दुधाळ, ज्ञानेश्वर कांबळे, सचिन आवटे, विजय लोखंडे, संजय औसरमल, बन्सी पारडे, शांती सेन, अकबर मुल्ला, महेश झपके, गंगा धेंडे, कविता खराडे, ज्योती गोफने, संगीता कोकणे, बाबुराव शितोळे, डॅनियल दळवी, राजेंद्र सिंग वालिया, निर्मला माने, बाळासाहेब चौधरी, मनीष शेडगे, कुमार कांबळे, बाळासाहेब पिल्लेवार, प्रशांत महाजन, यश बोथ, शुभदा पवार, मेहक इनामदार, मनीषा गटकळ, सुनीता अडसूळ, सविता धुमाळ, आशा मराठे, माधवी सोनार, मिरा कदम, सपना कदम, रिजवाना सय्यद, वर्षा शेडगे, लता सोनवणे, तिरमलर कवडे, धनाजी तांबे, विजय दळवी, राजू चांदणे, अंकुश बाबर, सुनील अडागळे, जियाउद्दीन नागुर इत्यादींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.