दिनांक २५/०४/२०२५ रोजी सकाळी तक्रारदार महिला या घरातुन निघून कामाचे ठिकाणी जात असताना त्यांचा वापरता मोबाईल हा कोठेतरी पडून गहाळ झाल्याचे त्यांना त्यांचे कामाचे ठिकाणी गेल्यावर समजले.
हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी क्क्रारदार आले असता त्यांचेकडून माहीती घेवून त्यांच्या फोनचे गुगल लोकेशन पाहीले असता, ते सुमारे ३० मिनीट पुर्वी महादेव मंदिर पाठीमागे, रविदर्शन पुणे या भागातील असल्याचे दिसून आले. पोलीस अंमलदार महावीर लोंढे हे सदर भागात तात्काळ रवाना होवून मोबाईलचा शोध घेत असताना, सदर ठिकाणी पत्र्याचे शेड असलेली घरी सदरचा मोबाईल मिळून आला. सदर भागात फिरून कौशल्यपुर्वक माहीती घेवून तक्रारदार यांचा हरवलेला मोबाईल शोधण्यात यश आले. तक्रारदार यांना त्यांचा मोबाईल हा सुखरूम परत दिला आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार महावीर लोंढे यांचे पथकाने कामगिरी केली आहे.