फरासखाना वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदाराने वाचविले पीएमटी ड्रायव्हरचे प्राण

फरासखाना वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदाराने वाचविले पीएमटी ड्रायव्हरचे प्राण
सदर बाबत माहिती अशी की, आगामी येणारे गणेशउत्सवाचे पार्श्वभुमीवर छत्रपती शिवाजी महाराज रोड, लक्ष्मी रोड येथे खरेदी करण्यासाठी येणारे गर्दी होती, त्याप्रमाणे  दिनांक २५/०८/२०२५ रोजी बेलबाग चौकामध्ये पोलीस कॉन्स्टेबल ८९६८ रोमेश ढायरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल ८०९२ अर्चना निमगिरे असे गर्दी खूप असल्याने सकाळ पासुन वाहतूक नियमन करीत असतांना सांयकाळी १९/१५ वा. सुमारास लक्ष्मी रोड मार्गावरील बस क्रमांक MH-12-QG-2067 पुणे स्टेशन ते कुंबेर पार्क (कोथरुड डेपो) ही सीटी पोस्ट ऑफिसचे समोर आली असतांना बस ड्रायव्हर नामे अनिल लक्ष्मण अंबुरे वय ४१ वर्षे राहणार वारजे माळवाडी पुणे शहर यांना बस चालवित असतांना अचानक हृदय विकाराचा (हार्ट अॅटक) झटका आला त्यामुळे बस मधील लोक भयभीत होऊन मदत मिळणेकरीता आवाज देत होते.

 

त्यावेळेस बेलबाग चौकामधील पोलीस अंमलदार रोमेश ढावरे व अर्चना निमगिरे यांनी बस मधील लोकांचा आवाज आल्यानंतर त्यांनी लागलीच पीएमटी बसमध्ये जावून परिस्थिती पाहून ड्रायव्हरला लोकांचे मदतीने फुटपाथवर झोपविले तेव्हा बस चालक हे बेशुध्द अवस्थेत असल्याचे पाहून पोलीस अंमलदार रोमेश डावरे यांनी हाताने सीपीआर देत होते, त्यांना थोड्याच वेळात ते शुध्दीवर आल्याने त्यांचे पुढील उपचारकामी अॅम्बुलन्सची वाट न पाहता रोमेश ढावरे यांनी फरासखाना वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी  संदिप मधाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक व सह प्रभारी अधिकारी  संजय गायकवाड पोलीस उप निरीक्षक यांना कल्पना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली बस चालकाला ताबडतोब रिक्षा ड्रायव्हर राजेश शंकर आरकल रा. मार्केटयार्ड पुणे शहर यांचे मदतीने स्वतः रिक्षामध्ये बसवून बस ड्रायव्हर यांना पुना हॉस्पीटल येथे उपचारकामी दाखल केले आहे.

 
याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल ८९६८ रोमेश डावरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल ८०९२ अर्चना निमगिरे यांनी आपले वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावीत तात्परता दाखवून रिक्षा चालकाचे मदतीने येळेत पीएमटी ड्रायव्हर यांना उपचार मिळवून त्यांचे प्राण वाचविले आहे.