भोसरी, म्हाळुंगे एमआयडीसी व इतर भागात मोटार सायकली चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरटयास अटक

भोसरी पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :- पिपंरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलीस स्टेशन हददीत मोठया प्रमाणात रहिवासी व रहदारी असणारे क्षेत्र असल्याने मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. शशिकांत महावरकर साो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी साो, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ १ श्रीमती स्वप्ना गोरे साो, सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग श्री. सचिन हिरे, यांनी वारंवार होणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना पायबंद घालून मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत श्री. संदीप घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. भारत शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. सचिन शिर्के, पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस ठाणे, यांना सुचना दिल्या होत्या. श्री. संदीप घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस ठाणे यांनी भोसरी पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक सुहास खाडे व
अमंलदारांना मार्गदर्शन करून त्यांना सुचना दिल्या. तपास पथक अधिकारी, अंमलदार यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणांना भेटी देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज द्वारे बारकाईने तपास केला. सातत्याने विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासात तसेच सदर ठिकाणी सापळे लावुन व मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरटयाबाबत माहिती प्राप्त केली. दिनांक १७/०१/२०२५ रोजी पोलीस उप निरीक्षक सुहास खाडे, सहा पोलीस फौजदार राकेश बोयणे, पोना १८१० भोजणे, पोशि २२१९ खाडे, पोशि २५२१ गारोळे, पोशि १९८२ जोशी, पोशि २०८२ साळवे यांनी रेकॉर्डवरील आरोपी नामे सागर भाऊसाहेब शिंदे वय - ३२ वर्षे, रा. आंबेठाण गाव, किरण नाणेकर यांची रूम चाकण पुणे मुळ पत्ताः सोनगाव सात्रळ, ता. राहुरी जि. अहिल्यानगर (अहमदनगर) यास प्राप्त सीसीटीव्ही फुटेज वरून व तात्रिक विश्लेषणावरून ताब्यात त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने भोसरी,
म्हाळुंगे एमआयडीसी परीसरातुन काही दुचाकी चोरून पुढे विक्री करण्यासाठी विधीसंघर्षीत बालक नामे राहुल गोकुळ मोरे याचेकडे दिले असुन चोरीच्या ०२ मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपी नामे
सागर भाऊसाहेब शिंदे व त्याचा साथीदार योगेश बाबासाहेब इल्ले रा. चाकण मुळ पत्ता:- सोनगाव सातरळ, ता. राहुरी जि. अहिल्यानगर असे दोघांनी भोसरी म्हाळुंगे एमआयडीसी या परीसरातुन चोरी केलेल्या ०६ मोटारसायकल काढून दिलेल्या असून त्या गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
आरोपी नामे सागर भाऊसाहेब शिंदे हा अट्टल गुन्हेगार असुन त्याने राहुरी पोलीस ठाणे
अहिल्यानगर, येथे दरोडा सारखा गंभीर गुन्हा केला आहेत. नमुद आरोपी कडुन गुन्हयातील चोरी केलेल्या एकुण ३,९०,०००/- रुपये किं च्या ०८ मोटार सायकल हस्तगत करणेत आले असुन खालील पोलीस ठाणेचे एकुण ०८ गुन्हे उघडकिस आणलेले आहेत. १) भोसरी पोलीस ठाणेकडील एकुण ०२ गुन्हे २) म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणेकडील एकुण ०६ गुन्हे सदर कामगिरी मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त साो, पिंपरी चिंचवड
आयुक्तालय, मा. सह पोलीस आयुक्त, श्री शशिकांत महावरकर साो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी साो, मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ १ श्रीमती स्वप्ना गोरे साो, सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग
श्री. सचिन हिरे, श्री. संदीप घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. भारत शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. सचिन शिर्के पोलीस निरीक्षक भोसरी पोलीस स्टेशन, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोउनि श्री सुहास खाडे,
सपोफौ राकेश बोयणे, मपोहवा नुतन कोंडे, पोना प्रकाश भोजने, पोलीस अंमलदार प्रभाकर खाडे, महादेव गारोळे, ज्ञानेश्वर साळवे, अनिल जोशी यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.