समाजसेवेच्या-कार्यातून-दिली-लोकाभिमुखतेची-आगळीवेगळी-भेट
(विशेष प्रतिनिधी : रूपाली बैसाने)
मुंबई उपनगरातील चारकोप विधानसभेचे आमदार योगेश अमृतलाल सागर यांनी 4 ऑक्टोबर रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त विकासकामांचे भूमिपूजन करून लोकसेवेचा संकल्प दृढ केला.
मुंबई उपनगरातील चारकोप विधानसभेचे आमदार योगेश अमृतलाल सागर (जन्म 4 ऑक्टोबर 1962, मालाड) यांनी आपल्या वाढदिवशी एक आगळीवेगळी सामाजिक परंपरा जपली — आमदार निधीतून विकासकामांचे भूमिपूजन करून समाजसेवेचा उत्सव साजरा केला.
चारकोप सेक्टर 1 मधील भवानी कृपा सोसायटी येथे लादी बसवण्याचे आणि मलनिस्सारण वहिनीचे काम, तसेच दत्तनिवास, वीरमाता आणि प्रत्यय सोसायट्यांमधील विकासकामांचे उद्घाटन करत त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.
नगरसेवकापासून मंत्रीपर्यंतचा प्रवास करताना सागर यांनी नेहमीच पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुखता जपली आहे. “हर घर स्वदेशी – घर घर स्वदेशी” या घोषणेसह त्यांनी मतदारसंघातील विकासाच्या दिशेने नवा संदेश दिला.
सामाजिक संस्थांमार्फत होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणारे, आणि मतदारांच्या प्रत्येक समस्येकडे स्वतः लक्ष देणारे आमदार योगेश सागर यांना वाढदिवसानिमित्त जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
“त्यांच्या हातून जनकल्याणाची अनेक मौल्यवान कार्ये घडोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!”