सिंहगड रोड पोलीस स्टेशन च्या रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगाराकडुन दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुस केले जप्त.

सिंहगड रोड पोलीस स्टेशन च्या रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगाराकडुन दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुस केले जप्त.

पुणे प्रतिनिधी :-  दि. १६/०१/२०२५ रोजी तपास पथकातील संतोष भांडवलकर,
पोलीस उप-निरीक्षक, आबा उत्तेकर पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार / ३८८ केकाण, पोलीस हवालदार/२४६ तारु, पोलीस अंमलदार / ९१८३ ओलेकर, पोलीस अंमलदार / ९१९१ क्षीरसागर, पोलीस
अंमलदार /८३४२ पाटील असे सिंहगडरोड पोलीस स्टेशन हाद्दीत मा. वरिष्ठांचे आदेशाने गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार / आण्णा केकाण, राहुल ओलेकर व विनायक मोहीते यांना
त्याचे खास बातमीदारामर्फत बातमी मिळाली की, सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी नामे बाळु ढेबे यांचेकडे गावठी पिस्टल असुन तो स्वामीनारायण मंदीर ते तक्षशिला सोसायटीकडे जाताना चे व्हीजन स्कुलचे पाठीमागील रोडवर न-हे, पुणे येथील सर्व्हिस रोडवर थांबलेला आहे अशी बातमी
मिळाली असता लागलीच त्यानी सोबतचे पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर यांना कळविली असता त्यांनी ती मा. वरिष्ठांनी कळविल्याने मा. वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्यती कार्यवाही करण्याचे आदेश
दिल्याने, सदर कार्यवाही करणे कामी संतोष भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक, आबा उत्तेकर पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार / ३८८ केकाण, पोलीस हवालदार / २४६ तारु, पोलीस अंमलदार / ९१८३
ओलेकर, पोलीस अंमलदार / ९१९१ क्षीरसागर, पोलीस अंमलदार / ८३४२ पाटील असे खाजगी वाहनामधुन पंचनामा करण्यासाठी लागणारे सर्व साधन सामुग्रीसह लॅपटॉप प्रिंटरसह रवाना झाले मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन पाहणीकरता पोलिस ओळखत असलेला व पोलीस रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी बाळु ढेबे हा सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसला त्याची व पोलिसाची नजरा नजर होताच तो त्या ठिकाणावरुन पोलिसाची  नजर चुकवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच वरील स्टाफचे मदतीने काही अंतरावर त्यास २२.१५ वा. चे सुमारास पकडुन त्यास नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता बाळु धोंडीबा ढेबे वय-२७ वर्षे रा. राम मंदिर जवळ जनता वसाहत पुणे असे असल्याचे सांगितले. त्यास सदर ठिकाणी थांबण्याचे व पोलिसांना  पाहुन घाई घाईने निघुन जाण्याचे कारण विचारले असता त्यांने पोलिसांना  उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागल्याने तो काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशानेच थांबला असल्याची पोलिसांची  खात्री झाल्याने पोलीस लागलीच पंचासमक्ष त्याची अंगझडती घेता त्याचे जवळ ८०,०००/- रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्टल व २,०००/- रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे मिळुन आल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त सो, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. संभाजी कदम सोो, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ - ३,पुणे शहर श्री. अजय परमार सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर श्री. दिलीप दाईंगडे साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. उत्तम भजनावळे सोो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली
सहा पोलीस निरीक्षक श्री. सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, अमोल पाटील, विनायक मोहीते, शिवाजी क्षीरसागर,राहुल ओलेकर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे, विकास बांदल, स्वप्निल मगर, यांचे
पथकाने केली.