महाराष्ट्र विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतोदपदी आमदार शेखर निकम

महाराष्ट्र विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतोदपदी आमदार शेखर निकम
चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा प्रतोदपदी चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांची नियुक्ती झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार शेखर निकम यांची विधानसभेच्या प्रतोद पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. आ. निकम यांच्या प्रतोदपदी केलेल्या नियुक्तीला मान्यता द्यावी, असे पत्र विधानसभा अध्यक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी दिले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव यांनाही याबाबतचा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आमदार शेखर निकम यांची राष्ट्रवादीच्या प्रतोदपदी नियुक्ती झाल्याने चिपळूण- संगमेश्वरमधील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
 
चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवताना दुसऱ्यांदा विजयाची मोहोर गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमटवली आहे. तर पहिल्याच टर्ममध्ये विधी मंडळात चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न उपस्थित करून ते प्रश्न मार्गी लावले आहेत. तर या मतदारसंघात सुमारे अडीच हजार कोटींचा निधी आणून विकासाला मोठी चालना दिली आहे. तर गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयाची मोहोर उमटवली.
 
 एकंदरीत आमदार निकम यांनी विधिमंडळात केलेले अभ्यासपूर्ण भाषणे, मांडलेले विकासात्मक मुद्दे यावरून निकम यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. याचीच दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार शेखर निकम यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतोद विधानसभा या पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र विधानसभा अध्यक्ष यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊन मान्यता द्यावी, असे नमूद केले आहे. या निवडीबद्दल चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून आमदार शेखर निकम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.