ॲड.आदर्श अरुणराव जाधव यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना राज्य सचिव (लिगल सेल) पदी निवड.

ॲड.जाधव हे पोलीस बॉईज संघटने मध्ये मराठवाडा अध्यक्ष पदावर कार्यरत होते. या पदावर असताना पोलिसांचे विविध प्रकारचे प्रश्न, पोलीस पाल्यांच्या समस्या , पोलीस परिवाराचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले.ही संघटना पूर्ण महाराष्ट्रात काम करत असून, पोलिसांचे विविध प्रकारचे प्रश्न असतील. त्यात त्यांना वैद्यकीय सुविधा, पोलीस पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, त्यांचा राहण्याचा प्रश्न असेल यासाठी वेळोवेळी मा. गृहमंत्री यांना पाठपुरावा करून त्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी प्रयत्न केले.तसेच इतर सामाजिक कार्यात देखील मा. राहुल दुबाले यांचा मार्गदर्शनाखाली उत्तम काम करत आलेले असून. ते वकिली क्षेत्रा मध्ये देखील उत्तम अशा प्रकारे आपली सेवा देत आहेत. त्यांचा या शिक्षणाचा फायदा या पदावर काम करत असताना नक्कीच संघटनेला व पोलीस कर्मचाऱ्यांचे, पाल्यांच्या व परिवाराचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल.
मा.राहुल दुबाले(संस्थापक अध्यक्ष )यांचा मार्गदर्शनाखाली ॲड.आदर्श जाधव यांची निवड करण्यात आली. त्यांचा या निवडीबद्दल सर्व मित्र परिवार तर्फे सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा.