सत्ता येते-जाते, पण निष्ठा कायम राहते.. सचिन चिखले यांची मनसेप्रती अखंड बांधिलकी!..
पिंपरी :-संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय वातावरण तापले असून, अनेक जण सत्तेच्या गणितात अडकत सोयीच्या राजकारणाचा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत. उमेदवारी मिळावी म्हणून पक्ष बदलले जात आहेत, विचार बाजूला ठेवले जात आहेत आणि नाती तुटत आहेत. अशा वेळी राजकीय कारकिर्दीच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन चालणारे माजी नगरसेवक सचिन चिखले पुन्हा एकदा त्याच झेंड्याखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सत्ता, पद किंवा तिकीट यापेक्षा पक्ष, विचार आणि स्वाभिमान मोठा असतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
आज अनेकांसाठी पक्ष म्हणजे केवळ एक वाहन झाले असताना, सचिन चिखले यांच्यासाठी मनसे म्हणजे एक कुटुंब आहे, एक विचार आहे आणि एक भावना आहे. अडचणी आल्या, संघर्ष झाले, वेळ प्रतिकूल होती; तरीही त्यांनी कधीही पक्षाशी तडजोड केली नाही, झेंडा खाली ठेवला नाही. त्यांची ही भूमिका केवळ राजकीय नाही, ती भावनिक बांधिलकीची साक्ष आहे.
मनसेवर, राज ठाकरे यांच्या विचारांवर आणि सामान्य कार्यकर्त्यांवर असलेला विश्वास त्यांनी अखेरपर्यंत जपला. आजच्या संधीसाधू राजकारणात सचिन चिखले यांची एकनिष्ठता ही दुर्मिळ आणि प्रेरणादायी ठरत आहे. ही निवडणूक केवळ विजय- पराजयाची नसून, निष्ठा विरुद्ध संधीसाधूपणा यांच्यातील लढाई आहे. आणि या लढाईत मनसेचा झेंडा उंच ठेवत सचिन चिखले आत्मविश्वासाने पुढे चालले आहेत.