पुणे, (प्रतिनिधी): दोन दिवसापूर्वी यवतमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली सदर बाब अत्यंत गंभीर असून शासन पातळीवर याबाबत योग्य ती कारवाई व्हावी याकरिता हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक 31 जुलै 2025 रोजी यवत येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोषभाऊ जगताप यांनी पुणे जिल्हाधिकारी आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना दिले. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कापसे, पुणे शहराध्यक्ष रवीभाई शिंगवी,राष्ट्रीय संघटक डॉक्टर नागेंद्र दीक्षित, पुणे शहर उपाध्यक्ष राजेंद्र जाधव व सुकृत इंगळे आदी उपस्थित होते.
सदर विटंबना ही एका विकृत बुध्दीच्या व्यक्तीने केली असून त्याचे आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, सातबारा, तसेच इतर सर्व दस्ताऐवज जप्त करण्यात यावे. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सदर प्रकरणावर योग्य ती कारवाई प्रशासनाकडून केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
ज्या ज्या तालुक्यांमध्ये छत्रपतींच्या विरोधात किंवा हिंदूंच्या विरोधात घडणाऱ्या घटना याच्या विरोधात आंदोलने न करता त्यावर उलट प्रतिक्रिया करण्याची आमची सर्व हिंदू एकता समुहाची भावना झालेली आहे. त्यामुळे आपण जर या घटनेचा गांभिर्याने विचार केला नाही आणि सदर जिहादी मुस्लिम व्यक्तीवर योग्य कारवाई केली नाही तर आम्ही कुठल्याही प्रकारचे निवेदन न देता रस्त्यावर उतरुन जशास तसे उत्तर देवू याची नोंद असावी असे देखील सदर निवेदनात नमूद केले आहे.