इचलकरंजीत डॉ. कलाम यांना अभिवादन; वाचन प्रेरणा दिन साजरा
इचलकरंजी, दि. १५ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ. कलाम यांच्या जीवनचरित्राचे सामूहिक वाचन करण्यात आले.
महानगरपालिका सभागृहात आयोजित अभिवादन कार्यक्रमात उपायुक्त राहुल मर्ढेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिक्षण अधिकारी बी. एम. कासार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात येत असल्याने महानगरपालिकेच्या रवींद्रनाथ टागोर वाचनालयात त्यांच्या जीवनचरित्राचे सामूहिक वाचन करण्यात आले. या उपक्रमातून वाचनाची आवड जोपासण्याचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी सहायक आयुक्त सुनील शिंदे, रामचंद्र कांबळे, नितीन बनगे, नगरसचिव राहुल पोटे, भांडार अधीक्षक गणेश शिंदे, उद्यान व वनसंवर्धन विभागप्रमुख प्रशांत आरगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, ग्रंथपाल बेबी नदाफ यांच्यासह संदीप जोशी, सदाशिव जाधव, आयुब शेख, युवराज भोसले, राहुल राजापुरे, इर्शाद मोमीन, हर्षद गायकवाड, पायल खरे, महादेव देसाई, सचिन शेडबाळे, विकास कांबळे, विद्या कुंभार आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.