जागतिक महिला दिनानिमित्त घाटकोपरमध्ये अखिल नारी शक्ती वस्ती विकास संस्थेचा शानदार सोहळा

जागतिक महिला दिनानिमित्त घाटकोपरमध्ये अखिल नारी शक्ती वस्ती विकास संस्थेचा शानदार सोहळा

अखिल नारी शक्ती वस्ती विकास संस्था ( रजि ) घाटकोपर -महाराष्ट, जे समाजातील गरीब गरजू महिला, रस्त्यावरील मनोरुग्ण,किंवा बेवारस लोक, अन्यायग्रस्त महिला, बेरोजगार महिला, वंचित आणि शोषित महिलांचा उद्धारासाठी ज्यांनी कधी वेळ काळ नाही पाहिला, निस्वार्थपणे कार्य करणारे " अखिल नारी शक्ती वस्ती विकास संस्था महाराष्ट्र(रजि ) संस्थेचे संस्थापिका अध्यक्षा व अनेक संस्था संघटनांचे पदे भूषविणारे समाजसेविका सौ.संगिता सुर्यकांत मांडे यांनी अशा अनेक प्रकारची निस्वार्थ समाज कार्याबद्दल तसेच महिलांच्या कुठल्याही समस्याचे निवारण करुन त्यांना संस्थेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे कार्य करत असलेल्या अखिल नारी शक्ती वस्ती विकास संस्था ( रजि ) घाटकोपर - महाराष्ट्र आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी दिनांक २२-०३-२०२६ रोजी सायंकाळी ६ = ०० वाजता श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर काजुटेकडी घाटकोपर ( पश्चिम ) मुंबई ८४ या ठिकाणी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.संगिता सुर्यकांत मांडे व सौ रंगिता मंगलदास पवार खजिनदार,संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी  जागतिक महिला दिना साजरा केला

या कार्यक्रमाच्या दिनानिमित्त सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक,कला , क्रीडा, आरोग्य व इतर क्षेत्रात काम करत असलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शाल गुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले व विविध विषयांवर महिलांस मान्यवरांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सौ.अश्विनीताई भरत मते (बाजार,व उद्यान , महिला व बालकल्याण समिती सदस्य आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आणि "एन" प्रभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा नगरसेविका १२९ ) ,सौ.सुरेखा सत्यवान गवळी , सौ.कांचन बढे (समाजसेविका), श्रीमती.आशा कोरडे, श्रीमती.कांचन साळवी , रेहाना शेख, सौ. सविता चाकणे, सोनलताई शिंदे,सौ. तनुजा सोनवणे, सौ.उज्वला पवार, सौ.पद्ममाताई, सौ.प्रतिक्षा शिंदे ,सौ.अश्विनी इंदुलकर, सौ.नंदा गव्हाणे,सौ.सरिता डाकरे , श्री.महेंद्र.आर. चौधरी( पोलिस मित्र सेवाभावी फाऊंडेशन.(राष्ट्रिय अध्यक्ष), अरविंद  जोशी(राष्ट्रीय सचिव), आशा कांबळे(द.म.मु.महिला जिल्हा अध्यक्ष),साजिद अन्सारी ,व संस्थेचे सर्व पदाधिकारी, विभागीय महिला बहुसंख्येने उपस्थित दर्शवली  व सर्व मान्यवरांनी संस्थेची माहिती देऊन जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या