केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार

छत्रपती संभाजीनगर, दि. १५ : केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी मराठवाडा दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात ते छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या चार जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

श्री. आठवले यांचे सकाळी ८ वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन होईल. सकाळी १०.१५ वाजता मुकुंदवाडी येथील जिमखाना क्लब येथे दुष्काळी परिस्थितीच्या आढाव्यासंदर्भात पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अडगाव सरक येथे ते दुष्काळी परिस्थितीची पाहणी करतील.

दुपारी १२.२५ वाजता जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देवगाव कुसी आणि दुपारी १२.४५ वाजता मालेगाव येथे ते पाहणी करणार आहेत. दुपारी १.१५ वाजता अंबड चौफुली येथील सिद्धार्थ फर्न हॉटेल येथे पत्रकार परिषद होईल.

सायंकाळी ४.१५ वाजता बीड जिल्ह्यातील राजुरवेस येथून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणापर्यंत आयोजित रॅलीत ते सहभागी होतील. सायंकाळी ४.३० वाजता क्रीडांगणावर नागरिकांशी संवाद साधतील.

त्यानंतर रात्री ८.३० वाजता ते धाराशिव येथे पोहोचतील. तेथील पुष्पक हॉटेल येथे त्यांचा मुक्काम असेल. या दौऱ्यात रामदास आठवले मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित भागांचा आढावा घेणार आहेत.