पंडित दीनदायाळ उपाध्याय जयंती निमित्ताने महापालिका मुख्यालयात अभिवादन

पनवेल दि.25: पंडित दीनदायाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज (25 सप्टेंबर) त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त मंगला माळवे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे,  मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम व्होरकाटे, लेखा परिक्षक संदिप खुरपे, आस्थापना विभाग प्रमुख किर्ती महाजन, जनसंपर्क अधिकारी नितीन साके, इतर महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.