महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक संचांचे वितरण

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक संचांचे वितरण

मुंबई, प्रतिनिधी (सौ रूपाली बैसाने ) : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याच्या उद्देशाने कांदिवली (पश्चिम) येथील एक्सप्लनेड कॉलेजमध्ये ज्युनियर व सिनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक संचांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त मोर्चा, मुंबईचे महामंत्री सोनमताई त्रिपण्णा यांनी केले होते. यावेळी कॉलेजचे ट्रस्टी जयेशभाई, नगरसेवक तथा भाजपा उत्तर मुंबई अध्यक्ष दीपक (बाळा) तावडे, भाजपा भटके विमुक्त मोर्चा मुंबई अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, पदाधिकारी बलराज वारकर, गिरीधर साळुंखे, अशोक वाडेकर, माजी नगरसेविका सुरेखा पाटील, प्राचार्य डॉ. रेश्मा वझे, प्राचार्य डॉ. दीपक वाणी, महाविद्यालयाचे कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

संभळ वादन, ईशस्तवन, सरस्वती वंदना आणि स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, जिद्द आणि परिश्रम याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी एकूण ८४ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक संचांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता घाडीगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राकेश सूर्यवंशी सर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाची माहिती भाजपा भटके विमुक्त मोर्चाचे पदाधिकारी गिरीधर साळुंखे यांनी आमच्या विशेष प्रतिनिधींना दिली