आदर्श नागरिक घडण्यासाठी रामचरित्र वाचणे गरजेचे ह भ प सुहास कुलकर्णी

आज समाजाला प्रभू श्रीरामचंद्रांच्या विचारांची नितांत गरज आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात घोर कलियुगामध्ये बिघडलेला जो समाज आहे त्याला आदर्श नागरिक घडवायचं असेल समाजामध्ये एक रामराज्य पुन्हा आणायचे असेल तर आणायचे असेल तर तर प्रभू रामचंद्रांच्या विचारांची गरज आजच्या समाजाला आहे प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचा विचार करता मर्यादीमध्ये कसं राहायचं ईश्वरी अवतार असूनही मानवाच्या मर्यादा काय आहेत हे ज्यांनी जगाला दाखवून दिलं असे श्री प्रभू रामचंद्र आहेत
मातृ पितृ भक्त आपल्या पित्याची आज्ञा पूर्ण करण्यासाठी पित्याने दिलेला शब्द पाळण्यासाठी 14 वर्षे वनामध्ये वनवास भोगला यामधून आपल्याला असे दिसून येते की प्रभू रामचंद्र हे मातृ-पितृभक्त आहेत शिवाय आपल्या वडिलांनी दिलेला शब्द पाळणे आपल्या वडिलांचे वचन पाळणे किंवा रघुकुल की रीत सदाचली आई प्राण जाये पर वचन न जाये असे कुळाचा मानसन्मान राखण्यासाठी वनवासाला गेलेले प्रभू रामचंद्र आहेत म्हणून आपल्याला असे दिसून येते की त्यांच्या वागण्यातून ते मातृ पितृ भक्त आहेत व आई-वडिलांचे भक्ती करण्यात त्यांचा शब्द पाळण्यात आपली धन्यता मानत आहेत
तसेच ते गुरुभक्त ही आहेत लहानपणापासूनच महर्षी वशिष्ठ व असुरांचा वध करण्यासाठी यज्ञाचे रक्षण करण्यासाठी विश्वामित्रांनी अत्यंत लहान वयात ज्यांना बोलवून घेतले व साधुसंतांचे रक्षण करण्यासाठीच जन्म झाला आहे हे त्यांनी दाखवून दिले होते
तसेच प्रभू रामचंद्र हे एक वचनी होते म्हणजे आपण दिलेला शब्द तो पाळणे शब्द कधीही न फिरवणे आपल्या शब्दांमध्ये बोलण्यात आणि वागण्यात कधीही न फरक करणे हा गुण त्यांच्या अंगी होता आज समाजाला अशा गुणांची आवश्यकता आहे विशेषतः राजकारणी व्यक्तींना हा गुण फार महत्त्वाचा आहे असे मला वाटते
प्रभू रामचंद्र एक बाणी होते म्हणजेच त्यांच्या धनुष्यबाणातून सुटलेला बाण तो कधीही कार्य सिद्ध केल्याशिवाय माघारी फिरत नसे आपलेही आपण ठरवलेले कार्य सिद्ध केल्याशिवाय किंवा ध्येय गाठल्याशिवाय माघारी फिरायचे नाही अशी प्रेरणा आपल्याला यातून मिळत आहे
प्रभू रामचंद्रांच्या व्यक्तिमत्त्वाचा अजून एक पैलू म्हणजे प्रभु रामचंद्र हे एक पत्नी व्रत धारण करणारे होते आपली पत्नी सोडून बाकीच्या सर्व स्त्रिया ह्या परस्त्री ही मातेसमान मानणारे होते हा फार मोठा गुण त्यांच्या अंगी होता आजच्या समाजामध्ये अन्याय अत्याचार वाढत चाललेला आहे स्त्रियांची अब्रू वेशीवर टांगण्यात येत आहे अशा वाईट नजरा ने पाहणाऱ्या लोकांनी एकदा तरी प्रभू रामचंद्रांचे चरित्र वाचणे आवश्यक आहे
प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेस सीतामाईंचं दुष्ट रावणाने हरण केलं त्यावेळेस आपल्याबरोबर वानरांना घेऊन आस्वलांना घेऊन रावणावर चालून गेले यातून पशुपक्ष्यांना साथ घेऊन घेऊ दृष्टांवर मात करता येते पशुपक्ष्यांवर प्रेम करा ते आपल्याला साथ देतात हाही संदेश त्यांनी दिलेला आहे
समुद्रामध्ये सेतू बांधून अशक्य ही गोष्ट शक्य करून त्यांनी दाखवलेली आहे रावणाचा भाऊ बिभीषणाला आश्रय देऊन त्यांनी दया दाखवलेली आहे दया हा भाव त्यांच्या अंगी असलेला आपल्याला दिसून येतो दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती हे त्यांनी दाखवून दिलेले आहे तसेच शबरी मातेची उष्टी बोरे त्यांनी खाल्लेली आहेत त्यावेळेस त्यांनी कसलाही जातीभेद मानू नका फक्त प्रेम भाव पहा असा मोलाचा संदेश या जगाला दिलेला आहे
प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये उत्कृष्ट देव आणि भक्त याचे उदाहरण पाहायला मिळते प्रभू रामचंद्र व मारुतीराया यांचे प्रेम आपणास पाहायला मिळते तसेच लक्ष्मण आणि भरताच प्रेमही आपणास पाहायला मिळालेले आहे म्हणजेच भावामध्ये प्रेम असल्यावर कलह निर्माण होणार नाही कुटुंब आनंदात जीवन जगते सुख शांतीला नांदते यावरून आपल्या दिसून येते बंधुप्रेमाचे उदाहरण आपणास दिसून येते
रावणाला शेवटी प्रभू रामचंद्रांनी मारले धर्माने युद्ध केले व रावणाला मोक्ष पदास पाठवले दुष्ट व्यक्ती अनाचाराने वागू लागला किंवा स्त्रीचा अपमान करू लागला तसेच जगामध्ये मीच श्रेष्ठ अहंकार आला अशा वृत्तीला प्रभू रामचंद्र वध करतात हे आपल्याला दिसून आलेले आहे.
तसेच प्रभू रामचंद्रांनी आयोध्या नगरीमध्ये अतिशय छान पद्धतीने राज्य केलेले आहे रामराज्य कल्पना ही त्यावेळी पासून आलेली आहे म्हणून आपल्या बोली भाषेतही म्हणतात रामराज्य यावे प्रभू रामचंद्रांनी आपल्या राज्यामध्ये दुःख द्वेष मच्छर प्रजेच्या मनामध्ये कसल्याही पद्धतीने येऊ दिला नाही प्रत्येकाला प्रभू रामचंद्र हे आपले वाटत होते आपला राजा आहे असे वाटत होते म्हणून सर्वांनी प्रभू रामा चंद्राबद्दल प्रचंड आदर होता.
थोडक्यात सांगायचे झाले तर प्रभू रामचंद्रांचे चरित्र हे आपल्याला आपली मर्यादा काय आहे हे शिकवते आई-वडिलांचे बद्दल प्रेम आपुलकी शिकवते भावाभावामध्ये प्रेम बंधुता भावांचे आचरण कसे असावे हे शिकवते स्त्रियांचा आदर कसा करावा हे रामायण शिकवते अनादर झाला तर रावणाला कसे मारावे हे शिकवते तसेच हनुमंताकडे सर्व ताकद असूनही नम्रता व स्वामिनीष्टता हे रामायण आपल्याला शिकवते म्हणून आजच्या पिढीने आपल्याला आदर्श घडवायचं असेल आदर्श समाज घडायचा असेल एक आदर्श नागरिक घडायचे असेल तर रामायण वाचणे ही काळाची गरज आहे प्रत्येकाला आपली काय जबाबदारी आहे व आपण कसे वागले पाहिजे हे नक्की समजून येईल जय श्रीराम
श्री सुहास श्रीकांत कुलकर्णी
Mo No .7756096975