डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण नॅशनल अवॉर्डने प्रा.छाया बोरकर सन्मानित.
सुजातपूर तालुका देगलूर जिल्हा, नांदेड येथे १८ जानेवारी २०२६रोजी जेतवन बौद्धभूमी येथे तिसरे भारतीय बौद्ध धम्म परिषद पार पडली असून,या तिसऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय बौद्ध महिला बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रा.छाया बोरकर होते.
बौद्ध धर्माचे मानवतावादी मूल्य समाजातील तळागाळा पर्यंत पोहचावे समाजात समता,न्याय बंधुत्व,प्रस्थापित व्हावा तसेच मानवी मूल्याचा प्रचार प्रसार आणि ते प्रत्येक माणसात रुजावे यासाठी या कार्याचा
औचित्य साधून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसारासाठी,सामाजिक समता, बंधुता व मानवी मूल्यासाठी छाया बोरकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना"डॉ बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण नॅशनल अवॉडने"सन्मानित करण्यात आले.
प्रा.छाया तानबाजी बोरकर यांना यांच्या सामाजिक, साहित्यिक,शैक्षणिक, क्षेत्रात कार्यरत असून
मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत. तसेच साहित्य क्षेत्रात विशिष्ट प्रकारचे योगदान असून प्रा.छाया बोरकर यांचे पळसफुले काव्यसंग्रह, अडला हरी गाढवाचे पाय धरी, माणसाने खाल्ल्या मिठाला जागावं,शेर शिजला ईस्तो इजला, हिरवाई मनात जपताना चारोळी संग्रह, "रणरागिणी"कादंबरी, "शापित शृंखला" काव्यसंग्रह, झाडीच्या झुरवा काव्यसंग्रह,जगाला पुन्हा बुद्ध पाहिजे, "हो,मी सावित्री बोलता"नाटक असे अनेक साहित्य प्रकाशित असून "जगाला पुन्हा बुद्ध पाहिजे" विद्येचा विधाता" हे पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.