सोलापुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अभिवादन
Ks news प्रतिनिधी संदेश कांबळे सोलापूर
सोलापूर : विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्ताने सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे असलेल्या त्यांच्या पुतळ्यास सोलापूर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अक्कलकोटचे आमदार श्री. सचिन दादा कल्याणशेट्टी, आमदार श्री. देवेंद्र दादा कोठे, महापौर श्री. विनायक कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त अध्यक्ष आनंददादा चंदनशिवे, विश्वस्त सचिव रॉकी बंगाळे, उत्सव समितीचे उपाध्यक्ष राज नाना लोखंडे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक समता, बंधुता आणि न्याय यांच्या मूल्यांचा जागर केला. संपूर्ण परिसरात जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.