होमिओपॅथीला पुराव्यासह जगासमोर येण्याची गरज - डॉ. अनिल खुराणा (अध्यक्ष, होमिओपॅथी राष्ट्रीय आयोग, भारत सरकार)
पुणे, कोथरूड: होमिओपथीचे परिणाम चांगले आहे हे आता दुसऱ्यांना समजून देण्यासाठी पेशंटचा के-स्टडी करून यांचे उपचारा पूर्वी आणि उपचारानंतरचे पुरावे सादर केले तर लोकांचा विश्वास होमिओपॅथीवर वाढेल. टेक्नॉलॉजीला जोडून काम करण्याचे आवश्यकता आता आहे. बदलत्या युगाप्रमाणे ए.आय. चा उपयोग करून आपला डेटा संग्रहित करण्याची गरज प्रत्येकाला भासणार आहे. असे प्रतिपादन भारत सरकारच्या होमिओपॅथी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल खुराणा यांनी केले
.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक फिजिशियन संस्थेच्या वतीने 'होमिओ वर्ल्ड व्हिजन २०२५' या दोन दिवसीय परिषद २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी स्वामी विवेकानंद सभागृह, एम.आय.टी कोथरूथ येथे आयोजीत करण्यात आली होती. प्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष तन्वीर हुसैन, पद्मश्री वी.के. गुप्ता, डॉ. निशिकांत थापे, डॉ. अजित कुलकर्णी, प्रो. डॉ. एम.ए. राव, डॉ. कुमार ढवळे, प्रो. डॉ. आर. रामय्या, मिलिंद निकुण, डॉ. मंगेश जतकर, डॉ. निरंजन मोहंती, डॉ. सुधांशू आर्या, डॉ. हरीश शिंदे आदि उपस्थित होते.
परिषदे दरम्यान डॉ. अनिल खुराना यांना पद्मश्री डॉक्टर के. जी सक्सेना मेमरीवर लाईफ टाईम अच्युमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज मेलोरियल होमिओ विशिष्ट सेवा पुरस्काराने डॉक्टर रमाकांत दगडे यांना गौरवण्यात आले. डॉ. जी. एल. एन. शास्त्री मेमोरियल होमिओ विशिष्ट सेवा पुरस्काराने डॉक्टर जी. श्रीनिवासुल यांना प्रदान करण्यात आला तर डॉ रविंद्र कोचर यांना देखील सोहळ्याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. वैजयंती नगरकर मुख्य (वैद्य अधिकारी आयुष डिपार्टमेंट, स्वास्थ्य मंत्रालय) डॉ. एम. ए. राव व डी. एस. एच. मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य मनीषा सोलंकी यांनी विशेष प्रयत्न केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ वैजयंती नगरकर व अर्पि बारोट यांनी तर आभार डॉ. दहाड यांनी मानले.