अवैध व्यवसायीक गॅस सिलेंडरच्या २१ टाक्या सह ६०,०००/- रु मुददेमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांची कारवाई
पुसद तालुका प्रतिनिधी
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध गॅस सिलेंडर साठवणुक, अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक २७/०३/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पुसद उपविभागात अवैध धंदे, अवैध गॅस सिलेंडर साठवणुक, बाबत गोपनिय माहीती काढत असतांना 13/00 वाजण्याचे सुमारांस माहीती मिळाली कि, इद्रप्रस्थ नगर येथील इसम नामे-सावरलाल मथुरालाल जाट यांच्या घरी अवैध व्यवसायीक गॅस सिलेंडर साठवणुक करुन आहे अशी माहीती प्राप्त झाल्याने पुरवठा निरीक्षक पुसद तसेच पंचा सह सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता इसम नामे-सावरलाल मथुरालाल जाट यांच्या घरी अवैध व्यवसायीक इण्डेन, एचपी (HP) अशा वेगवेळया कंपनीचे एकूण 19 गॅस सिलेंडर 19Kg तसेच 02 गॅस सिलेंडर 5kg असे एकूण 21 व्यवसायीक गॅस सिलेंडर टाक्या मिळून आल्याने इसम नामे-सावरलाल मथुलाल जाट यांचे भाउ सुरेंद्र मथुलाल जाट रा. इद्रप्रस्थनगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ याचेकडे सदरचे गॅस सिलेंडर टाक्या बाबत विचारपूस केली असता उडवाउडवीचे उत्तरे देवून कोणत्याही प्रकारचे कागदपत्र सादर केले नसल्याने सदरचे गॅस सिलेंडर हे अवैधरित्या साठवणुक करुन केले असल्याने एकूण 21 गॅस सिलेंडर असा अंदाजे ६०,०००/- रु मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेवून निरीक्षक अधिकारी तसेच पुरवठा निरीक्षक तहसिल कार्यालय पुसद हे योग्य ती पुढील कारवाई करीत आहे.
याव्दारे सर्व नागरीकांना अहवान करण्यात येते कि, कोणीही अवैध गॅस सिलेंडरचा साठा करुन ठेवू नये तसेच अवैध गॅस साठवणुक करुन जादा दराने विक्री करु नये अवैध गॅस सिलेंडर साठा करीत असल्याचे कोणाला माहीती असल्यास त्याबाबत माहीती दयावी त्याच्यावर योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो.से) सा, मा. सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी जे सा, मा.पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा. तहसिलदार पुसद रेखा वाणी मॅडम यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, सफौ/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/रमेश राठोड, पोहवा कुणाल मुंडोकार, पोशि/सुनिल पंडागळे, पोउपनि रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, निरीक्षण अधिकारी अमोल महाजन, पुरवठा निरीक्षक आशिष पवार, संगिता तेर, अव्वल कारकून छाया जामकर, लिपीक अमित अजमिरे, छाया लोंढे, गोदाम व्यवस्थापक सतिष आळणे तहसिल कार्यालय पुसद यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.