डॉक्टर तरूणीस आत्महत्येस प्रवृत्त करणा-या डॉक्टरला नवी मुंबई येथून शोध घेवून केली अटक.

डॉक्टर तरूणीस आत्महत्येस प्रवृत्त करणा-या डॉक्टरला नवी मुंबई येथून शोध घेवून केली अटक.
नवी मुंबई प्रतिनिधी :- डॉक्टर कुलदिप आदिनाथ सावंत वय-३० वर्षे रा.५२१७, वॉर्ड क्र.०६, उमराणी रोड, शंकर कॉलनी जत ता.जत जि.सांगली सध्या रा. पुणे याने त्याचे पुर्वी लग्न झालेले असताना देखील जीवनसाथी डॉटकॉम या संकेतस्थळावर आपण अविवाहीत असल्याचे नमुद करुन लग्नासाठी नोंदणी केली. सदरची नोंदणी पाहून फिर्यादी हे त्यांना स्वतः जावून भेटले असता, त्याचे वागणे व त्याचे दवाखाना त्यांना योग्य वाटले नाही म्हणून त्यास नकार कळविला. त्यानंतर देखील त्याने फिर्यादी यांची मुलगी पल्लवी पोपट फडतरे हिस मोबाईलवर परस्पर संपर्क केला. तिचेशी मैत्री करुन, तो अविवाहित असल्याचे तिस भासवून तिचेसोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून मुलीकडून १० लाख रुपयांहून अधिकची रक्कम घेवुन ती माघारी परत केली नाही त्यामुळे फिर्यादी यांची मुलगी डॉ. पल्लवी पोपट फडतरे हिस मानसिक धक्का बसून, मानसिक त्रास देवून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे म्हणुन फिर्यादी यांनी कुलदिप आदिनाथ सावंत याचे विरुद्ध तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १५/२०२५ मा. न्या. सं.१०८ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
 
दाखल गुन्हयातील आरोपी कुलदिप सावंत याचा मा. पोलीस उप आयुक्त श्री. डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पो. आयुक्त श्री. वन्यकुमार गोडेस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शंकर साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचे तपास चालु असताना तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून व तांत्रिक तपासावरून नमुद आरोपी हा नवी मुंबई येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झालेने त्याचा शोध घेणे कामी वरिष्ठांचे परवानगीने पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव, सहा. पोलीस फौजदार सोमनाथ सुतार, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे व अजय कामठे यांची टिम तयार करून रवाना केले असता नमुद टिम दोन दिवस नवी मुंबई तळ ठोकून आरोपी नामे कुलदिप आदिनाथ सावंत वय ३० वर्षे रा.५२१७, वॉर्ड क्र.०६, उमराणी रोड, शंकर कॉलनी जत ता.जत जि. सांगली यास दिघा नवी मुंबई येथून ताब्यात घेवून दिनांक २४/०१/२०२५ रोजी गुन्हयात अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव हे करीत आहेत.
 
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, बिबवेवाड़ी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव, सहा. पोलीस फौजदार सोमनाथ सुतार, पोलीस अंमलदार संतोष जाधव, निलेश खोमणे, सुमित ताकपेरे, अजय कामते, विशाल जाधव, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले व प्रणय पाटील यांनी केली