पुणे : समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था आणि मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. राजश्रीताई गागरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे शिबिर २० मे २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत, प्लॉट नंबर ४५१, भीमा बंगलो ,स्वामी समर्थ स्कूल समोर, इंद्रायणीनगर , भोसरी येथे पार पडले. या उपक्रमाला महिला तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बऱ्याच महिलांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवली, तर एकूण ४८४ हून अधिक नागरिकांनी विविध वैद्यकीय सेवांचा लाभ घेतला. विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
शिबिरातील वैद्यकीय सेवा पुढीलप्रमाणे होत्या:
डॉक्टरांकडून सविस्तर वैद्यकीय तपासणी
ECG (हृदय तपासणी)
रक्तदाब तपासणी (BP) – मोफत
रक्तातील साखर तपासणी (RBS) – मोफत
शरीरवजन व उंची तपासणी (BMI) – मोफत
डॉक्टरांचा वैयक्तिक सल्ला
नेत्रतपासणी व आवश्यक सदस्यांना अल्पदरात चष्मे वितरण.
विशेष आकर्षण:
सर्व सहभागी नागरिकांना ₹५०० मूल्यमापनाचे मोफत मेडिकव्हर हेल्थ कार्ड देण्यात आले. याशिवाय, चविष्ट अल्पोपहाराची विशेष व्यवस्था देखील करण्यात आली होती.
शिबिरादरम्यान अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, "धावपळीच्या जीवनशैलीत आपण कुटुंबासाठी सर्व काही करतो, पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. अशा वेळी सौ. राजश्रीताईंनी घेतलेला हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून आम्ही त्यांच्या आभारी आहोत."
या वेळी नगरसेविका सीमाताई सावळे, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी ताई वाबळे, तसेच संस्था पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला असून नागरिकांच्या समाधानाने उपक्रमाच्या यशस्वीतेची पावती दिली आहे.