रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशाची उद्या गोराई येथे महत्त्वपूर्ण बैठक

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशाची उद्या गोराई येथे महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई, दि. २४ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाला केलेल्या १०० वर्षांच्या पूर्तीनिमित्त मुंबईत भव्य संविधान सन्मान सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशाची महत्त्वपूर्ण बैठक उद्या, बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता बोरिवली पश्चिम, गोराई येथील बेव्ह्यू हॉटेलच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले या बैठकीस प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीस मुंबई प्रदेशातील सर्व वॉर्ड, तालुका, जिल्हा व मुंबई स्तरावरील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पक्षाच्या महिला आघाडी, युवक आघाडी तसेच इतर सर्व आघाड्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी केले आहे.