बार कौन्सिल महाराष्ट्र-गोवा २०२६ विजयी उमेदवारांचे पुण्यात भारतीय पत्रकार संघ लीगल विंगतर्फे भव्य स्वागत व सत्कार

बार कौन्सिल महाराष्ट्र-गोवा २०२६ विजयी उमेदवारांचे पुण्यात भारतीय पत्रकार संघ लीगल विंगतर्फे भव्य स्वागत व सत्कार

पुणे : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा २०२६ च्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून विजयी झालेल्या ८ नवनिर्वाचित सदस्यांचा भारतीय पत्रकार संघ लीगल विंग महाराष्ट्र राज्याच्या वतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

राज्यातील २ लाखांहून अधिक ॲडव्होकेट मतदार आणि १५५ हून अधिक उमेदवारांच्या चुरशीच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत इतिहास घडवला.

यावेळी विजयी उमेदवार ॲड. गणेश बाप्पासाहेब शिरसाट, ॲड. राजेंद्र बाबुराव उमाप, ॲड. विठ्ठल भाऊराव कोंडे देशमुख, ॲड. डॉ. राजेंद्र दत्तात्रय अनभुले, ॲड. विकास विठ्ठलराव ढगे-पाटील, ॲड. अहमदखान उस्मान खान पठाण, ॲड. रंजना भोसले आणि ॲड. माधवी पोतदार यांचा गुणगौरव करण्यात आला.

भारतीय पत्रकार संघ लीगल विंग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ॲड. कैलास पठारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास उपाध्यक्ष पांडुरंग ढोरे पाटील, महासचिव ॲड. योगेश तुपे-पाटील, संघटक ॲड. हेमंत भांड-पाटील यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

विजयी उमेदवारांनी वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे तसेच पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी व वकील संरक्षण कायद्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

भारतीय पत्रकार संघ लीगल विंगच्या सामाजिक, विधी व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचे सर्वांनी कौतुक केले. उपस्थित मान्यवरांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.