आदेश जनतेचा’ चे संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील यांना भारतरत्न नॅशनल अवॉर्ड 2026 प्रदान

आदेश जनतेचा’ चे संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील यांना भारतरत्न नॅशनल अवॉर्ड 2026 प्रदान

पुणे :-आदेश जनतेचा’ या वृत्तपत्राचे संपादक श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांना सामाजिक व मीडिया क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल *भारतरत्न नॅशनल अवॉर्ड 2026* ने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान जीवन जागृती सेवा संस्था यांच्या वतीने प्रदान करण्यात आला असून त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणारे व विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणारे बाबुराव क्षेत्रे पाटील यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत जीवन संजीवनी सेवा संस्थेमार्फत त्यांना गौरविण्यात आले.

या सन्मानानिमित्त अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्रामीण विभाग अध्यक्ष श्री योगेश भोसले, शिरूर तालुका अध्यक्ष श्री प्रकाश खरडे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.

तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री सचिन खंडागळे, पुणे जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष श्री योगेश भोसले, पुणे जिल्हा संघटक श्री महेश शर्मा, श्री मुनाफ पटेल, पुणे शहर उपाध्यक्ष श्री राहुल सकट, कार्याध्यक्ष श्री नेताजी पवार, कामगार विभाग अध्यक्ष अविनाश क्षीरसागर, पुणे शहर अध्यक्ष विकास शिंदे व समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.